क्रिएटिव करिअर मार्गदर्शन

FREE वर्कशॉपसाठी आपला सहभाग नोंदवा: 9167013959

लाईफ आणि करिअर हा काही आंधळी कोशिंबिरचा खेळ नाही तर तो आवड, कौशल्य आणि मार्केटची आवश्यकता म्हणजेच नोकरीची उपलब्धता यांचा सुरेख मेळ आहे. म्हणून या ऍडव्हर्टाइझिंग क्रिएटिव्ह करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे. मुलांवर काही लादण्याआधी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी. तसेच मंथन आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक प्रदर्शन पहावे.
यंदा मंथन आर्ट स्कुलने “ऍडव्हर्टाइझिंग क्रिएटिव्ह करिअर गाईडन्स २०१७” या महोत्सवाचे आयोजन केले आहे. दिनांक २७, २८ व २९ मे रोजी कला दालन सभागृह, पु.ल. देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. शशिकांत गवळी, तुषार मोरे, अनंत बोवलेकर यांच्यासारखे नामांकित दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे थेट मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळू शकणार आहे. यामध्ये चित्रकला, लेखन कला, फोटोग्राफी कला आदींच्यामाध्यमातून सहज  आणि प्रवाही करिअर्स कसे व कोणते निवडावे, सर्जनशील क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी पालक-विद्यार्थ्यांसाठी या महोत्सवात उपलब्ध असणार आहेत.
थोडक्यात काय तर शैक्षणिक गुणवत्ता असली तर करिअर चांगले होते असा विद्यार्थी आणि पालकांचा मोठा गैरसमज आहे. कित्येकदा पालकांच्या इच्छेखातर किंवा योग्यवेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मुलं आपल्या आवडीच्या करिअरपेक्षा प्रवाहाचा ओघ पाहून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतात. परिणामी डॉक्टर, इंजिनीअर व एमबीए यांची एक लाट तयार होते. मागणीपेक्षा पुरवठा जास्त वाढला की नोकऱ्यांची कमतरता आढळते. यातून येणाऱ्या मानसिक कुचंबण्याची, नैराश्याची अवस्था सर्रास आपणास पाहावयास मिळते. मोठ्या पगाराच्या, नोकरीच्या लालसेने मुलं कामातील समाधान हरवून बसलेले आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. आवड व नैसर्गिक गुणवत्तेला न्याय देणारे करिअर निवडले तर कौशल्याचा विकास होतो. त्यातूनच चांगली नोकरी, पगार व कामातलं समाधान प्राप्त होते.
बारावी पास-नापास, ग्रॅज्युएट पण  आजही भविष्यातील करिअरच्या निर्णयापर्यंत न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर सीईटी-यासारख्या एंट्रन्स परीक्षा प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कला शाखेतील वास्तव व जबाबदारीची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम असणार आहे. अप्लाइड आर्ट, फिल्म्स, ग्राफिक्स डिझाईन, फोटोग्राफी, ऍनिमेशन, फॅशन, युआय- युएक्स यासारख्या विविध विषयांची माहिती मुलांना करून दिली जाईल.
 यासोबतच ग्राफिक्स डिझाईन, अप्लाइड आर्टसारख्या हमखास नोकरीची खात्री असलेल्या विभागातील दर्जेदार कामांची ओळख करून दिल्याने ग्राफिक्सबद्दल असलेले गैरसमज दूर होतील. वेळ आणि पैशांसोबतच विद्यार्थ्यांचा उत्साह कसा अबाधित राहील हे खूप महत्त्वाचे आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क – ९१६७०१३९५९

27th – 29th May 2017

 

SHARE VENUE CALL