IDEASUTRA(आयडिया सूत्र)

या FREE वर्कशॉपसाठी आपला सहभाग नोंदवा: 9167013959

अप्लाइड आर्ट हे करिअर म्हणून बाय चॉईस स्वीकारल्या नंतर स्पर्धा आणि स्पर्धेतील सहभागापासून लांब राहणं म्हणजेच ” ताकाला जाऊन भांडे लपवण्या सारखं असतं. प्रत्येकवेळी जिंकण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यायचा असतो, असेही नाही. कोणतीही   स्पर्धा  आणि त्यातून आपला सहभाग आपली कुवत व आपली क्षमता याची जाणीव करुन देत असते. आपल्या कल्पनाशक्तीला पुरेसा वाव देत असते. एखादे ब्रॅण्डिंग करणं किंवा एखादी वस्तू विकण्यासाठी जाहिरात करणं आणि एखाद्या सामाजिक समस्येवर भाष्य करणारी सोशल अॅड,  पोस्टर , फिल्म करणं यात जमीन आसमानचे अंतर असते! ते खऱ्या अर्थाने आव्हानात्मक असते. इथे तुमच्या क्रिएटिव्हिटीचा कस लागतो. सल्ला आणि उपाय हा फुकटचा असला तरी कुणालाही नको असतो. खास करुन एखाद्या वाईट गोष्टीवर, प्रवृत्तीवर व सवयीवर तो नकोच नको असतो. अशी मानसिकता असणारा आपला टार्गेट ऑडिअन्स आकर्षित व्हावा, त्याने विचार करून action घ्यावी असा अवघड किल्ला प्रत्येक ग्राफिक्स डिझायनरला – क्रिएटिव्ह माणसांना सामाजिक जाहिरात करतांना लढवायचा असतो. एका अर्थाने याला वाघिणीचे दूध काढणे असेच म्हणता येईल.
अप्लाइड आर्टिस्ट हा ही याच  समाजाचा एक भाग आहे . आपणही या समाजाचे काही देणे लागतो. काही पोस्टर करून, फिल्म्स निर्माण करून, आपले creative inputs देऊन काही ना काही या समाजाची परतफेड करु शकतो.  सोशल सब्जेक्टवर सामाजिक अॅड बनवतांना कसा व कुठून विचार करावा? आयडिया,  फिल्मची संहिता सुचणे म्हणजे नक्की काय?  एखादि information,  idea मध्ये कशी बदलायची, फायनल एक्झिक्युशन पर्यंतचा प्रवास नक्की कसा करायचा? हे विद्यार्थीदशेत समजणे फार महत्त्वाचे आणि अनिवार्य आहे.

आजचा हा फास्टफूडचा जमाना असला तरी कल्पना या फास्टफूडसारख्या इन्स्टंट तयार होत नाहीत. त्यासाठी आपल्याला एका प्रोसेस मधून काम करावे लागते. मुळात आयडिया ही कधीही सहज येत नाही. ती सहज आपली होत नाही. ती रुसलेल्या गर्लफ्रेंडसारखं तिला मानवावं लागतं. तिला वेळ द्यावा लागतो. तिच्याशी संवाद साधावा लागतो आणि ही पद्धत ज्याला माहित असते त्यालाच जमते. खरंतर ज्याला आपल्या कल्पनांचे पाठपुरावा करणं जमतं तोच खऱ्या अर्थाने जिकंत असतो.
आयडिया फ्लर्टींगची कला वा या फ्लर्टींगचा आनंद जो यात प्रत्यक्ष सहभागी होतो त्यालाच अनुभवता येतो.

आयडियासाठीची मेहनत आणि रोमान्सचा आनंद हा फक्त न् फक्त स्वतःच्या experience करायचा असतो. इतरांच्या अनुभवातून याचा आनंद समजणं कठीण असते. म्हणून आयडिया डेव्हलोपमेंटचा खरा आनंद तुमच्या प्रत्यक्ष कामातून येण्यासाठी येत्या २४ डिसेंबर २०१६ रोजी manthan आयोजित केलेल्या “लेट्स फ्लर्ट विथ आयडिया” या वर्कशॉपमध्ये घ्या. Applied art च्या विद्यार्थ्यांनी तसेच ज्यांना फिल्म मेकिंग मध्ये करिअर करायचे आहे अशा सर्वांनी अवश्य सहभागी व्हावे. मंथनाच्या आतापर्यंतच्या अनुभवाचा व मंथनाच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत २४ पुरस्कार कसे व कुठल्या कारणाने मिळाले त्या प्रोसेसचा परिचय करुन देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमधून सोशल कॅम्पेनच्या आयडीयाज तयार करा आणि या प्रोसेसचा आनंद घ्या.
“आपलं प्रत्येक काम असा करा की रोमान्सपेक्षाही खूप रोमॅन्टिक होईल.”

SATURDAY
24th Dec
2016

 

SHARE VENUE CALL